भिलवडी प्रतिनिधी : आजच्या भरकटणाऱ्या तरुणांनी शिवरायांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे आहे. शिवरायांचा एक जरी गुण आपण आत्मसात केला तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. असे प्रतिपादन स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप (आप्पा) कदम यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त माळवाडी या. पलूस येथे जय शिवराय मंडळाच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसह शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदीप (आप्पा) कदम यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यानंतर उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन करत त्यांच्या कार्याला मानवंदना दिली.
यावेळी प्रदीप आप्पा कदम, शितल किणीकर व सरपंच अश्विनी साळुंखे यांनी मार्गदर्शन करत शिवरायांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.
प्रदीपआप्पा कदम म्हणाले, “शिवरायांचे विचार हे आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असून समाजहितासाठी आवश्यक आहेत. आजच्या भरकटणाऱ्या तरुणांनी शिवरायांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे आहे. शिवरायांचा एक जरी गुण आपण आत्मसात केला तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. शिवरायांना आदर्श म्हणून जे आपला जीवन प्रवास करत राहिले तेच आयुष्यात पुढे गेले आहेत. देश घडवू शकले आहे. तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीत छत्रपतींनी स्वतःचे स्वराज्य उभा केली आणि सर्वसामान्य माणसांना दिलासा दिला. म्हणूनच आज आपण ताट मानेने फिरू शकतो.
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या कार्यक्रमास अवधूत साळुंखे, सुरज मोहिते, शैलेंद्र साळुंखे, प्रसाद कांबळे, आशिष वायदंडे, सुजित वारे, शुभम निकम, सत्यजित पिसाळ, अनिल पाटील, सागर कदम, संजय शिंदे, अमिर पठाण, अभिजीत कौलगे, तुषार सूर्यवंशी, प्रविण गुरव, अंकुश राजमाने, दौलत पाटील यांच्यासह जय शिवराय मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या