सांगली : श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. "एक पेड माँ के नाम" या अभियानांतर्गत शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिसरात करंज, अशोक आदी विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षणाची गरज आणि हरित भविष्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका माया खटके, पर्यवेक्षक महेश पाठक, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख प्रसन्न कोरे, सहाय्यक शिक्षक सागर वाघमारे, वन विभागाचे अधिकारी प्रशांत वरुडे, वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील सर, तसेच कौशल्या भोसले, रेणुका घागरे, ज्योती घागरे आणि प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारत वृक्षलागवडीचा संकल्प केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या