मिरजेत ‘आनंदी पालकत्व’ मार्गदर्शन सत्र ६ जूनला
By -
जून ०२, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : मुलांवर योग्य संस्कार कसे करावेत आणि त्यांना माणुसकीची जाणीव असलेले जबाबदार नागरिक म्हणून कसे घडवावे, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी जीवनविद्या मिशन, मुंबई अंतर्गत ज्ञानसाधना केंद्र मिरज यांच्या वतीने ‘आनंदी पालकत्व’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे सत्र शनिवार, दि. ६ जून रोजी दुपारी ४ वाजता शाही दरबार हॉल, टाकळी रोड, मिरज येथे होणार असून प्रवेश विनामूल्य आहे.
सद्गुरू श्री. वामनराव पै प्रणीत जीवनविद्या तत्त्वज्ञानावर आधारित या सत्रात जीवनविद्या बालसंस्कार केंद्र कमिटी सदस्य तसेच जीवनविद्या कोर्सेस फॅकल्टी मेंबर्स सौ. सुनंदा माने या प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची भूमिका, सकारात्मक संगोपन, संस्कारांचे महत्त्व आणि मुलांमध्ये मूल्यांची जडणघडण कशी करावी याबाबत त्या मार्गदर्शन करणार आहेत.
“मुले म्हणजे मातीचा गोळा असून त्यांना जसा आकार दिला जातो, तशी त्यांची जडणघडण होते. त्यामुळे पालकांनी मुलांना केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर नैतिक, सामाजिक आणि मानवी मूल्यांनी समृद्ध करणे आवश्यक आहे,” या संकल्पनेवर आधारित हे सत्र आयोजित करण्यात आले आहे.
जीवनविद्या मिशनच्या “प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विचारपूर्वक” या बोधवाक्यानुसार पालकांना मुलांच्या संगोपनासाठी उपयुक्त अशा विविध बाबींवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन मिळणार आहे. सुजाण पालकत्वाच्या माध्यमातून सुसंस्कारित कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडविण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
सत्राबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी मारुती भावीकट्टी (९८२२८०८९९९), आण्णासो पुजारी (९४२३२७०३७७) किंवा अश्विनी गडकरी (९१७५६२०१५६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या