सांगली प्रतिनिधी : जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक पद्मश्री स्व. नाना चूडासामा यांच्या जयंतीनिमित्त जायंट्स ग्रुप सांगली पर्लच्या वतीने अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात १०० हून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली.
शिबिरासाठी हॉस्पिटलचे डॉ. मिलिंद किल्लेदार यांनी विशेष सहकार्य केले. त्यांनी गरजू नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला तसेच डोळ्यांतील दोष असलेल्या रुग्णांना पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन केले.
शिबिरानंतर डॉ. किल्लेदार यांनी जायंट्स ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती घेतली. स्व. नाना चूडासामा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आणि भविष्यातही अशा उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच शिबिराबाबतचे प्रशस्तीपत्रही त्यांनी संस्थेला प्रदान केले.
या उपक्रमाचे नियोजन अध्यक्षा रंजन साठे व जया जोशी यांनी केले. यावेळी माजी अध्यक्षा वैशाली कुलकर्णी, सेक्रेटरी माधवी जोशी, शैला बिजरगी, कांचन पाटील, सुनंदा भेंडवडे तसेच इतर सदस्य उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या