प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली: पोदार इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सांगली येथे ‘Yoga for Healthy Aging’ या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक सादर केले. गेल्या आठवडाभर विद्यार्थ्यांनी योगाचा नियमित सराव करून योगाचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व जाणून घेतले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या योग प्रशिक्षिका सौ. अर्चना कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, निरोगी वृद्धत्वासाठी योगाची गरज आणि नियमित योगाभ्यासाचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगप्रकारांचे सादरीकरण केले.
यावेळी शाळेचे प्राचार्य श्री. जी. बी. पाटील व उपप्राचार्या सौ. विद्या आवटे यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले. शाळेच्या क्रीडा विभागाने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. सामूहिक योगसाधना आणि निरोगी जीवनाचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या