प्रतिष्ठा न्यूज /योगेश रोकडे
सांगली: पोदार इंटरनॅशनल स्कूल, सांगली येथे जागतिक संगीत दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संगीतकलेचा आनंद लुटला.
यावेळी विद्यार्थ्यांनी ५० हून अधिक विविध वाद्यांची आकर्षक प्रदर्शनी भरवली. तसेच सुमधुर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. संगीताच्या विविध प्रकारांची ओळख करून देताना विद्यार्थ्यांनी आपली कला, कौशल्य आणि सर्जनशीलता प्रभावीपणे सादर केली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. कीर्ती पेटे (व्यावसायिक गायिका, संगीत विशारद व ऑल इंडिया रेडिओ ग्रेडेड कलाकार) यांनी विद्यार्थ्यांच्या संगीतावरील आवडीचे व सादरीकरणाचे कौतुक केले. संगीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असून प्रत्येकाने एखादी कला जोपासली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
संगीत शिक्षक श्री. प्रशांत भाटे व श्री. मयूर जोशी यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. जी. बी. पाटील व उपप्राचार्या सौ. विद्या आवटे यांनी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या