प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
दोंडाईचा:येथील स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे,श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड.महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.21 जून या दिवशी रविवार असल्याने ऑनलाईन पद्धतीने योग वर्गाचे आयोजन करण्यात आलेले होते.यावेळी प्रा.डॉ.एम.एस.उभाळे यांनी सूक्ष्म व्यायाम,शयन स्थितीतील आसने,विपरीत शयन स्थितीतील आसने व बैठे स्थितीतील आसनांचे मार्गदर्शन व सराव करून घेतला. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. त्याचप्रमाणे 22 जून रोजी ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालयाचे योग वर्गाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी प्रा.डॉ.एम.एस.उभाळे यांनी जलद हालचाली,पाठीवरील आसने, दंड स्थितीतील आसने,त्रिमुद्रा व काही प्राणायामांचा सराव उपस्थितांकडून करून घेतला.यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, "योग हा जीवनाचा अविभाज्य भाग व्हायला हवा.नियमित योगामुळे अनेक आजारांपासून दूर राहता येते. मानसिक,भावनिक व शारीरिक विकास होतो.योगामुळे व्यक्तीला परिपूर्ण आरोग्य लाभते" यावेळी महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी,विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. योग वर्गाच्या आयोजना संबंधी प्राचार्य प्रा.पी.डी. बोरसे यांनी मार्गदर्शन केले.तर प्रा. डॉ. एम. एस. उभाळे, प्रा.आर. पी. पाटील, प्रा. डॉ.योगिता चौधरी, प्रा. अमृता चव्हाण, प्रा. निशा ठाकूर, प्रा.रेवती बागुल यांनी योग वर्गाचे आयोजन केले.तर कृष्णा बागुल,शंकर गिरासे,अमर गिरासे, वीरपाल गिरासे यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या