प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : सांगली जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित U-16 बास्केटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सांगलीच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघांनी शानदार कामगिरी करत दुहेरी विजेतेपद पटकावले.
मुलांच्या संघाने झील इंटरनॅशनल स्कूल, सांगली ‘अ’, संथोम स्कूल, सांगली तसेच अंतिम फेरीत भानू तालीम संस्था, मिरज या संघांचा पराभव करून विजेतेपद मिळविले. तर मुलींच्या संघाने भरत पाटील अकॅडमी, मिरज, संथोम स्कूल, सांगली आणि अंतिम सामन्यात भानू तालीम संस्था, मिरज यांच्यावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला.
या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर वेदांत कांबळे, रक्षित गुप्ता, संकेत कदम, ओंकार करांडे, रणवीर भोसले तसेच परी माळी, सिद्धी शिंदे, वर्धना भोपाळे, सावी पिंजारकर आणि दरिया गवणकर यांची राज्यस्तरीय स्पर्धा शिबिरासाठी निवड झाली आहे.
या यशामागे प्रशिक्षक श्री. स्वप्निल खतकर यांचे मार्गदर्शन लाभले. संघाच्या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. जी. बी. पाटील, उपप्राचार्या सौ. विद्या आवटे आणि क्रीडा विभाग प्रमुख श्री. सुजित वाघमोडे यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 🏀🏆
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या