प्रतिष्ठा न्यूज /योगेश रोकडे
सांगली : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मूलनिवासी सभ्यता संघ, महाराष्ट्र राज्य आणि संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय मोफत वाचिक अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा रविवार, दि. २७ जून २०२७ रोजी सकाळी ९ :०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत मराठा सेवा संघ, सिद्धिविनायक हॉस्पिटल पाठीमागे, सांगली येथे होणार आहे.
कार्यशाळेमध्ये आवाज, उच्चार व संवाद सादरीकरणाचे तंत्र, वाचन, निवेदन आणि सूत्रसंचालनासाठी उपयुक्त मार्गदर्शन, तसेच प्रत्यक्ष सराव व शंकानिरसन यांचा समावेश असणार आहे.
या कार्यशाळेसाठी नाट्य व रेडिओ क्षेत्रातील अनुभवी कलाकार सुनील पाटील (आपल एफ.एम.) तसेच नाट्यलेखक व दिग्दर्शक विनोद आवळे हे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
नाट्य, निवेदन, सूत्रसंचालन आणि वाचिक अभिनयाची आवड असलेल्या युवक-युवतींनी या मोफत कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रवेशासाठी इच्छुकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकांवर नाव नोंदणी करावी, असेही सांगण्यात आले आहे.
अश्फाक शेख - ८७८८११००६२
ब्रिजेश संघमित्र – ९०११७४७४९३
सुरज कांबळे –८०८७८२०८७९
सचिन ठाणेकर – ९०२८९४९८२९
शुभांगी तिरमारे – ९०७५९९१६४२
राजू कांबळे – ९६०४२९३९५३
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या