प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशनच्या वतीने सांगली-मिरज परिसरातील शाळा व महाविद्यालयांसाठी ‘प्लास्टिक रिसायकलिंग वॉरियर कॉन्टेस्ट 2026-27’ या पर्यावरणपूरक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक पुनर्वापराची सवय रुजवून पर्यावरण संवर्धनाची चळवळ उभी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
‘For Our Future, For Our Pruthvi’ या ब्रीदवाक्याखाली राबविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत विद्यार्थी प्लास्टिक कचरा संकलन करून पुनर्वापरासाठी देणार आहेत. विशेष म्हणजे संकलित केलेल्या प्लास्टिकचा आर्थिक मोबदलाही विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ₹25 हजार, द्वितीय क्रमांकासाठी ₹15 हजार, तृतीय क्रमांकासाठी ₹10 हजार, चतुर्थ क्रमांकासाठी ₹7,500 आणि पाचव्या क्रमांकासाठी ₹5 हजारांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय ट्रॉफी, मेडल्स व प्रमाणपत्रेही प्रदान केली जाणार आहेत.
स्पर्धेसाठी नोंदणी 25 जून 2026 पर्यंत सुरू असून जुलै 2026 ते जानेवारी 2027 या कालावधीत दरमहा प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. अंतिम बक्षीस वितरण समारंभ फेब्रुवारी 2027 मध्ये होणार आहे.
या उपक्रमास मेधवराव महाबळ फाउंडेशन, ICPE आणि मॅग्नेविन यांचे सहकार्य लाभले आहे. इच्छुक शाळा व महाविद्यालयांनी QR कोडद्वारे नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी हिमांशू लेले (7030758874) किंवा पवन ठोंबरे (8605053881) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या