प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगांव : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.संस्थेचे गट निदेशक एस.डी.मुल्ला हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय के.एस.कोळी यांनी करून दिला.मान्य वरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन झाले.मुल्ला यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे मिलींद सुतार म्हणाले कि सगळे सण,संत,महंत, महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या आपण भारतीय सौर पंचांगातील तिथीप्रमाणे करतो.मग शिवराज्याभिषेक दिन इंग्रजी तारखेला का करावा ? जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ या तिथीला छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.त्यादिवशी योगा योगाने ६ जून १६७४ हि इंग्रजी तारीख होती.मात्र इंग्रजी आणि सौर पंचांग यामध्ये काही दिवसांचा फरक नक्की पडतो.त्या वादात न जाता आपण एका वैभवशाली दिवसाचे स्मरण करताना छ.शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न करुया.सध्याच्या युगात सामाजिक परिवर्तन करताना १)सामाजिक समरसता २)कुटुंब प्रबोधन ३)पर्यावरण संरक्षण ४)स्वबोध आणि ५)नागरिक कर्तव्य या पाच आयामांचा विचार करणे आवश्यक आहे. केवळ शाळा, महाविद्यालया तील क्रमिक पुस्तकांपुरते आपले जग मर्यादित न करता समाजाकडे आपण डोळस नजरेने पहायला शिकले पाहिजे. तरच आपण छ. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राचा एक जबाबदार नागरिक होऊ शकतो.तुमच्यापैकी जे विद्यार्थी भविष्यात उद्योग करू इच्छितात त्यांना स्वावलंबी भारत अभियान या संस्थेमार्फत सर्व मदत करण्यात येईल.केवळ छ.शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे स्मरण करुन चालणार नाही तर या दिवसाकडे खुप व्यापक नजरेने आपण पाहिले पाहिजे.असे प्रतिपादन सुतार यांनी केले.त्यानंतर एस.आय.मुजावर यांनी आभार प्रदर्शन केले.के.एस. कोळी यांनी सूत्रसंचालन केले.या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या