प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कलानगर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, सांगली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्रातील पहिली गणितीय लाठी-काठी मर्दानी खेळ स्पर्धा मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि दिमाखदार पद्धतीने संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीनराजे शिंदे, विजयदादा कडणे, नगरसेवक प्रकाश मुळके, नगरसेविका वर्षाताई निंबाळकर, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, माजी नगरसेवक शिवराज बोळास तसेच तक्षशिला स्कूलचे ट्रस्टी धनंजय वाघ उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवचरित्रातील शौर्य, मर्दानी खेळांचे महत्त्व, युवकांमधील शिस्त, आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाची गरज यावर मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करताना युवकांनी आपल्या परंपरा, संस्कृती आणि शौर्यकलेचे संवर्धन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
स्पर्धेत युवकांसह बालस्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत लाठी-काठीचे विविध डाव, कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिके आणि शिस्तबद्ध सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास कलानगर परिसरातील नागरिक, महिला, युवक तसेच मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी खजिनदार आनंद कमते, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, गजानन माने तसेच मंडळाचे सदस्य संग्राम मोहिते, प्रसाद चव्हाण, राहुल पाटील, हेमंत पंडित, अमेय पाटील, आशिष पाटील, सुनील पाटील आणि प्रसन्न कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित नागरिकांनी कलानगर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे विशेष कौतुक केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या