प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त निमणी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच विजय आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेली गुढी उभारून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना राष्ट्रशक्ती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी जाधव म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तब्बल साडेतीनशेहून अधिक वर्षे लोटली आहेत.मात्र आजही त्यांच्या राज्याभिषेक दिनाचे स्मरण करून लाखो शिवभक्त मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात.एखाद्या राजाचा राज्याभिषेक दिन शेकडो वर्षांनंतरही त्याची प्रजा एवढ्या श्रद्धेने आणि अभिमानाने साजरा करते, असे उदाहरण इतिहासात शिवरायांशिवाय दुसरे आढळत नाही."
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य नामदेव जमदाडे,माजी उपसरपंच आर.डी.पाटील,पोलीस पाटील सतीश पाटील, उदय राजमाने,रोहित पाटील,मनोहर पाटील,तात्यासाहेब पाटील,महादेव पाटील,श्रीहरी गुरव,अर्जुन जाधव, गजानन पाटील,शिवाजी देवकुळे,किसन माने,पांडुरंग पाटील,मुनिश्वर मस्के,जयश्री सूर्यवंशी,अक्कमहादेवी देवकुळे,शितल काळीबाग यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामस्थांनी शिवरायांच्या कार्याचा जागर केला असून, स्वराज्याच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या