प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात समाजसुधारक, शिक्षणप्रेमी व लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ.रत्नाकर म्हस्के यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा.म्हस्के म्हणाले की शाह महाराज यांच्या शिक्षणप्रेमी,पुरोगामी आणि समाजहितवादी कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.शिक्षण,सामाजिक समता, स्त्रीशिक्षण आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक उत्तरदायित्व जपावे,असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्र प्राचार्य डॉ रत्नाकर म्हस्के, डॉ.देवदत्त खजूरकर, डॉ.अर्चना चिखलीकर, प्रा.अंकुश पंडित प्रा.प्रमोद शेंडगे सांस्कृतिक विभागप्रमुख तसेच प्रशासकीय सेवक श्री संजय कुंभार हणमंत वाघमारे, सौ,सुजाता हजारे सौ.अस्मिता साळी, सौ. शितल पाटील व प्रशिक्षणार्थींनी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या