प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच आणि भारतीय बौध्द महासभेच्या सयुक्त विद्यमाने राजश्री शाहू महाराज याची 152 वी जंयती साजरी करण्यात आली.प्रास्तावीक दत्तात्रय बामणे यांनी केले.राजश्री शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पुजन जगन्नाथ शेवाळे यांनी केले.राजश्री शाहु महाराज यांच्या कार्याचा उल्लेख मनोगता मध्ये अनेक वक्त्यांनी मांडला.अंनिसचे अमर खोत यांनी वेगवेगळ्या पातळीवर अनेक संघटना काम करत असतात ते करत असताना समविचारी सघंटनांनी एकत्र येण्याची गरज बोलून दाखवली,भरत थोरात यांनी जंयतीच्या आयोजना संदर्भात कौतुक केले, विजय कोळी यांनी आपला वारसा गणपतराव कोळी यांच्याशी असल्याने जंयतीच्या निमित्ताने अनेक काम करत असलेल्या चळवळीच्या शिलेदारांचे कौतुक केले,जालींदर डावरे,दिनेश लोखंडे,रविंद्र कामत, आप्पासाहेब कांबळे यांनी शाहू महाराज याच्या विषयीचे आपले विचार मांडले.यावेळी प्रमोद कांबळे,काकासो कांबळे,मारुती कांबळे,बाबुराव थोरात व महीला कार्यकर्त्या सुनिता कामत,जयश्री लोखंडे ,प्रिया कांबळे उपस्थित होत्या.आयु शिलाराणी कांबळे यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या