सांगली प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्याईनेच आरक्षणाची सुरुवात झाली छ. शाहू नसते तर देशाला आरक्षण लागू झाले नसते असे मत कवलापूर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या जि प सदस्या सौ. मजुश्री कांबळे यांनी व्यक्त केले.
सामाजिक न्याय व सबलिकरण मंत्रालय भारत सरकार संचलित खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशनचे हौसाई वृद्धाश्रम सांगली येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त महिलाशक्ती चा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. माधवनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अंजुताई तोरो, संस्थेच्या संस्थापक सचिव सौ रश्मीताई भंडारे, ग्रामपंचायत सदस्या रेखाताई शेंडे आदी प्रमुख उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे होते.
यावेळी राजर्षी शाहू महाराज व दिवंगत हौसाई बंडू आठवले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
जिप सदस्या मंजुश्री कांबळे पुढे म्हणाल्या ‘माणसाला माणसापासून तोडणाऱ्या प्रथा नष्ट झाल्या पाहिजे. अनिष्ठप्रथा मोडीत काढल्या पाहीजे.’ जातपात मोठी नाही तर माणुसकी मोठी हा संदेश शाहू महाराजांनी दिला. छत्रपती शाहू महाराजांचे विचार सर्वांनीच आचरणात आणावेत.
संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे म्हणाले समता, सामाजिक न्याय, शिक्षण व बहुजन कल्याणाचे महान पुरस्कर्ते, लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यामुळेच आज संपूर्ण भारतात आरक्षणाची सुरुवात झाली छत्रपती शाहू राजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी ताकद उभी केली त्यामुळे डॉ आंबेडकर घडले, डॉ आंबेडकरांच्या कार्याला साथ दिल्यानेच आज देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली.
माधवनगरच्या सरपंच अंजुताई तोरो म्हणाल्या हौसाई वृद्धाश्रम मध्ये गरीब बे सहारा लोकांची सेवा होत आहे. सांगली जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर असे कार्य संस्थेने हाती घ्यावे. स्वागत प्रास्ताविक हौसाई वृद्धाश्रमाचे चेअरमन सिद्धार्थ कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन तथास्तु कल्चरल अकादमीच्या विभाग प्रमुख चैताली तातूगडे यांनी केले.
याप्रसंगी वृद्धाश्रमाचे उपाध्यक्ष जयवंत माळी, संचालक चंदन बनसोडे, अजय पवार, विकास भंडारे, धनराज जाधव, वकील शिवाजी कांबळे, नजीर मुजावर, हाजी शाबाद म्हेत्तर, महेंद्र गाडे, वकील अतुल डांगे, तथास्तु कल्चरल अकॅडमीचे शाहीर चंद्रकांत गायकवाड, संदीप कोरे ऋतुजा कांबळे आदी मान्यवर सभासद कर्मचारी व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार हौसाई वृद्धाश्रमाच्या अधीक्षक रेखा माळी यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या