सांगली, प्रतिनिधी : सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय खेत्रे यांच्या संकल्पनेतून आणि "अंध पालकांना डोळस मदत" या ब्रीदवाक्याला अनुसरून सांगली, मिरज, कुपवाड तसेच सांगली व कोल्हापूर परिसरातील दृष्टिहीन बांधव आणि त्यांच्या डोळस पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ओंकार हॉल (एस.टी. स्टँडच्या पाठीमागे, सांगली) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात अंध पालकांच्या शालेय विद्यार्थ्यांना वही, कंपास बॉक्स, पाण्याची बाटली, टिफिन बॉक्स आणि शालेय दप्तर अशा साहित्याचा समावेश असलेले Educational Kit वितरित करण्यात आले. तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त अशा White Cane (पांढरी काठी) चे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे समाधान दिसून आले.
यावेळी सुनील भोसले यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा वारसा आणि सामाजिक समतेचे विचार यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कु. कल्याणी माने यांनी केले.
या कार्यक्रमास राजेंद्र मेढेकर (वरिष्ठ निरीक्षक, केंद्रीय जीएसटी विभाग, सांगली), अभिजीत कोळी (नगरसेवक, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका), विशाल लालवानी, विनायक खेत्रे, ओंकार चिखले, राजेंद्र जामदार, निखिल काळे, अनिकेत परीट, साधना माळी (भाजप महिला मोर्चा, मिरज पश्चिम) व त्यांचा शक्तीपीठ बीसी ग्रुप, अब्दुल वाहिद तहसीलदार (हॉटेल रहमतुल्ला), मेहबूब पटेल, गीता काशीद व सहकाऱ्यांची उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या