सांगली दि.२६:सांगली महापालिका क्षेत्रातील संजयनगर, शामरावनगर, विजयनगर, शंभर फूटी रस्ता परिसर, झोपडपट्टी एरिया इ. संवेदनशील उपनगरात व ग्रामीण भागात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी. नशेखोरी वाढल्याने गुन्हेगारी बळावत चालली आहे.विशेषकरुन महिला वर्गात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यासाठी नशेखोरांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी धडक मोहीम राबवावी. पोलीस प्रशासनाने तयार केलेल्या कॅफेतील अवैध प्रकार प्रतिबंधक नियमावलीची कडक अंमलबजावणी करावी. महापालिकेडून बसवल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरे प्रकरणी पोलीस प्रशासनाचा समन्वय आणि त्याच्या देखभाल दुरुस्ती बाबत उपाययोजना निश्चित कराव्यात. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्कता वाढवावी अशी आग्रही मागणी आज भाजपा नेते मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी मा. तुषार दोशी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची समक्ष भेट घेऊन केली. पोलीस अधीक्षकांशी झालेल्या चर्चेत त्यांनी शाळकरी मुलगा वेदांत बंडगर याची निर्घृण हत्या ही गंभीर अमानुष घटना असून असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलून गुन्हेगारावर वचक बसेल असे नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेची सतर्कतेने अमलबजावणी करावी. तसेच धामणी येथे नशेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एका सर्वसामान्य व्यक्तीचा बळी गेला. अशा अमानुष घटना घडू नयेत. यासाठी आवश्यक ती कारवाई करावी इ. मागण्या केल्या. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने गुंडा पथक स्थापन केल्याबद्दल त्याचे स्वागत केले. मा. पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सतर्कतेने अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले.
सांगली महानगरपालिका क्षेत्रातील उपनगरे आणि ग्रामीण भागात रात्रीची गस्त वाढवावी ; नशेखोरीचे अड्डे उद्ध्वस्त करा : -पृथ्वीराजबाबा पाटील यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी
By -
जून २६, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या