प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांचा वाढदिवस ४ जुलै रोजी साजरा केला जातो.मात्र यावेळी पावसाळा सुरू होऊनही अनेक भागात पाऊस झाला नाही. येत्या वर्षभरात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते या पार्श्वभूमीवर आणि गेल्या वर्षभरात तासगाव-कवठेमहांकाळ व पर्यायाने महाराष्ट्रात झालेल्या सामान्य शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या गोष्टी लक्षात घेत वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आमदार रोहित पाटील यांनी घेतला आहे.यावेळी आ.रोहीत पाटील यांनी सांगितले की माझ्या मतदारसंघातील लोकांनी नेहमी समाजाप्रती संवेदनशील राहण्याचा संस्कार माझ्यावर केलेला आहेत.सध्या अनेक भागात अपेक्षित पाऊस झालेला नाही तर मागील काही महिन्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे.शेती पिकांवर याचा विपरीत परीणाम झाला असून अनेक शेतकरी कुटुंबे आर्थीक अडचणींचा सामना करीत आहेत . त्यामुळे बॅनर,फ्लेक्स व वाढदिवसावर होणारे इतर खर्च आपण टाळावेत,अशी विनंती केली आहे.दरम्यान अशा परीस्थीतीत वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्या ऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास प्राधान्य देवून गरजू नागरीकांना मदत,शैक्षणिक साहीत्य वाटप,वृक्षारोपन,रक्तदान शिबीर असे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपावी असे अवाहन आमदार रोहित पाटील यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या