प्रतिष्ठा न्यूज /योगेश रोकडे
सांगली : पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या सिंगापूर मॉडेल युनायटेड नेशन्स (SMUN) 2026 परिषदेसाठी निवड झाली असून, ते ४ जूनपासून सिंगापूर येथे होणाऱ्या परिषदेत सहभागी होणार आहेत.
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (NUS) येथील विद्यार्थ्यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी ही परिषद जगभरातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर विचारमंथन, वादविवाद, मुत्सद्देगिरी आणि नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देते. या परिषदेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक घडामोडींचे सखोल आकलन, प्रभावी संवाद कौशल्य, समस्या निराकरणाची क्षमता आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
या प्रतिष्ठित परिषदेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या रुपाली मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परिषदेची सखोल तयारी पूर्ण केली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चांमध्ये प्रभावी सहभागासाठी सज्ज झाले आहेत.
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य जी. बी. पाटील तसेच उपप्राचार्या विद्या आवटे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान, कौशल्य आणि नेतृत्वगुणांच्या बळावर परिषदेत उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या