प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:संत निरंकारी मिशनच्या वतीने शनिवार,दि.२७ जून रोजी तासगाव येथील संत निरंकारी सत्संग भवन, विटा रोड येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत हे शिबिर पार पडणार असून, गरजू रुग्णांना मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशन गेल्या ९७ वर्षांपासून जगभरात अध्यात्मिक जागृतीचे कार्य करीत असून सामाजिक सेवेतही मिशन सातत्याने अग्रेसर राहिले आहे.त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रभर विविध ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.या शिबिरासाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनची अनुभवी वैद्यकीय टीम मुंबईहून तासगावात दाखल होणार आहे. शिबिरामध्ये अत्याधुनिक जपानी संगणकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डोळ्यांची तपासणी,मोतीबिंदूचे निदान तसेच सामान्य नेत्र तपासणी केली जाणार आहे.
तपासणीनंतर ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे,अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया सांगली येथील रुग्णालयात पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या अनेक रुग्णांना या शिबिराचा मोठा लाभ होणार आहे.
दरम्यान,शिबिरानंतर सायंकाळी ७ ते रात्री ९.१५ या वेळेत त्याच ठिकाणी संत निरंकारी मिशनचा सत्संग सोहळाही आयोजित करण्यात आला आहे.तासगाव तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत नेत्र तपासणी शिबिर व सत्संगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन झोनल इंचार्ज नंदकुमार झांबरे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या