सांगली प्रतिनिधी : शारीरिक शिक्षण व निरामयता इयत्ता पाचवी ते बारावी पाठ्यपुस्तकांचा आराखडा कार्यशाळा निमित्त शारीरिक शिक्षण अभ्यास गट समितीचे सदस्य डॉ. भारत चिंतामणी बंडगर यांच्या “गतीशास्त्र” या शारीरिक शिक्षण विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात पार पडले.या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. संध्या जिंतूरकर, विशेषाधिकारी आरोग्य व शारीरिक शिक्षण (वि.का.), महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. महेश देशपांडे, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे होते.या पुस्तकात शारीरिक शिक्षण विषयातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला असून, शालेय अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षण हा विषय अत्यंत महत्त्वाचा असूनही प्रत्यक्षात तो दुय्यम ठरतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला प्रा. डॉ. दीपक शेंडकर (क्रीडा संचालक, मॉडर्न कॉलेज पुणे), डॉ. मनोहर माने (क्रीडा उपसंचालक, मुंबई विद्यापीठ), डॉ. निलेश जोशी (क्रीडा संचालक, श्री. हनुमान व्यायाम मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती), श्रीमती कविता नावंदे (क्रीडा मार्गदर्शक, छ. संभाजीनगर), श्री. शैलेश नाईक (सावंतवाडी), श्री. सतरंज कोठे (छ. संभाजीनगर), श्री. ज्ञानेश काळे (सातारा, महाराष्ट्र कबड्डी संघटना सहसचिव), डॉ. इब्राहीम मुल्ला (अॅथलेटिक कोच, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), डॉ. सुर्यकांत पाटील (क्रीडा संचालक, श्री. हनुमान व्यायाम मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती) यांच्यासह शारीरिक शिक्षण विषयाचे पदाधिकारी, संघटनांचे प्रतिनिधी व अभ्यास गटाचे सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. भरत कोळी (क्रीडा संचालक, आर. सी. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, शिरपूर, धुळे) यांनी केली. सूत्रसंचालन व आभार श्रीमती निता जाधव (अभ्यास गट सदस्य, मनपा क्रीडा समन्वयक, पंतनगर घाटकोपर पूर्व) यांनी मानले.या प्रकाशन सोहळ्यास प्रा. संजय ठिगळे (सदस्य, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ), ज्येष्ठ साहित्यिक श्री. भिमराव धुळूबुळू, तेजश्री प्रकाशनचे श्री. दादासाहेब जगदाळे, ग्रामीण लेखक श्री. सचिन पाटील, डॉ. विजय पवार (अध्यक्ष, जनसेवा आरोग्य व शिक्षण संस्था), तसेच श्री. प्रकाश खेडकर (प्रशासन अधिकारी, मनपा सांगली) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.✨ या प्रकाशनाने शालेय अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षण विषयाला अधिक महत्त्व देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
डॉ भारत बंडगर यांच्या “गतीशास्त्र” पुस्तकाचे प्रकाशन; शारीरिक शिक्षण विषयाला नवे परिमाण
By -
जून ०५, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या