सांगली : सांगलीच्या सिध्दहस्तलेखिका श्रीमती अनुराधा महादेव फाटक (वय-80)यांची वृध्दापकाळाने पुण्यात निधन झाले. केसरी दिवाळी अंकासाठी श्रीमती फाटक या अनेक वर्षे लेखन करीत होत्या. तसेच छोट्यांसाठी प्रसिध्द असणार्या छावा साप्ताहिकासाठी त्या सातत्याने लेखन करीत होत्या. अनेक कांदबर्या,कथासंग्रह,धार्मिक,ऐतिहासिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते.बालसाहित्यिका म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
त्या सांगलीत शिक्षकी पेशेतून निवृत्त होऊन पूर्णवेळ लेखन करीत होत्या. सांगलीतून पुण्यात स्थायिक झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा,सुन,नातवंडे असा परीवार आहे.
श्रीमती अनुराधा फाटक यांनी आतापर्यत वरदा,पूर्तता, ऋणवेध, अनुपमेय, जीवदान, बंधमुक्त, राऊप्रिया, गुण गाईन आवडी, आवर्त, अमृत संजिवनी कांदबर्यांचे लेखन केले आहे. तर अंतरीच्या गूढगर्भी, दर्भाचा कावळा , धुक्यातली सावली, ऋणानुबंध, सांजवात, वैदेही, शिळेतील अहल्या,क्षितीज, ब्रह्मकमळ, बाहुली आदी कथांसग्रह तर वादळ झेलताना, अंतर्नाद काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आहेत. शब्दलहरी, अलंकार समाजमनाचे, जडणघडण, बालमन आणि बालसाहित्य, समर्थांची प्रभावळ, दशावतार आदी साहित्यही त्यांच्या नावावर आहे.
त्यांना आतापर्यत विविध कथा-कांदबरी लेखनाचे भारतीय शिक्षण मंडळ, धर्मभूषण रामचंद्र जोशी पुरस्कार, पंद्मगंधा प्रतिष्ठान नागपूर, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर , मातृमंदिर, निगडी, पुणे, संत साहित्य पुरस्कार, शब्दांगण, मिरज साहित्य संघ, मातृमंदिर, निगडी, पुणे. संत साहित्य पुरस्कार, भारतीय शिक्षण मंडळ, पुरस्कार, अखिल भारतीय कवयित्री संमेलन, सरोजिनी नायडू पुरस्कार, मातृमंदिर, निगडी, पुणे, संत साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या