प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : ग्रामीण भागातील शिक्षणाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागीय समन्वय समितीच्या सदस्यपदी विसापूरचें माजी पंचायत समिती सभापती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील (भाऊ) पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे तासगाव तालुक्यासह संपूर्ण दक्षिण विभागातील शैक्षणिक क्षेत्राला बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.रयत शिक्षण संस्थेने समाजातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोठे कार्य उभे केले आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेच्या दक्षिण विभागीय समन्वय समितीवर सुनील भाऊ पाटील यांची निवड झाल्याने विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सुनील भाऊ पाटील यांनी पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना शिक्षण, ग्रामीण विकास आणि सामाजिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ संस्थेच्या शैक्षणिक व संघटनात्मक कार्याला होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या