सांगली प्रतिनिधी : सांगली शहरातील दत्त मारुती रोड वर असलेला हजरत पीर दावल मलिक दर्गा सन 1980 साली मास्टर प्लॅन राबवत असताना त्यावेळेचे जिल्हाधिकारी रत्नाकर वाघ यांनी बुलडोझर लावून जमीनदोस्त करून रस्ता बनवला होता. दावल मलिक च्या भक्तांनी कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन चा गैरफायदा घेऊन वाळू,वीट, दगड, पत्रे एकत्र करून त्या ठिकाणी पुन्हा हजरत पीर दावल मलिक नावाने बेकायदेशीर दर्गा उभा करण्यात आलेला आहे. पाडलेल्या दर्ग्यातील थडगे आमराईत नेऊन टाकले असताना दावल मलिक च्या ट्रस्टीनी एक थडगे गारपीर चौकातिल दर्ग्यात, व एक थडगे हसणी आश्रम येथे नेऊन ठेवले आहे. नव्याने बेकायदेशीर बांधलेल्या दर्ग्यामध्ये खोटी थडगी बनवली असून त्याच्यावर गलफ, फुलाच्या माळा चढवल्या जात आहेत. दर्ग्याच्या पुढील बाजूस महापालिकेचे नंबर नसलेली पाच खोकी बसवलेले असून ती खोकी दहा हजार रुपये भाड्याने दिलेले आहेत. या खोक्यांना महापालिकेचे नंबर नाहीत. या ट्रस्टींनी दर्ग्याचे बांधकाम पाडत असताना जिल्हा प्रशासनाला पुन्हा त्या ठिकाणी दर्गा बनणार नाही असे लेखी लिहून दिलेले आहे. असे असताना सांगली गणपती संस्थान जागा मालक असताना त्यांना अंधारात ठेवून हा बेकायदेशीर दर्गा उभारण्यात आलेला आहे व सदर दर्ग्याला बेकायदेशीरित्या वक्फ बोर्ड चा फलक लावला आहे. तो दर्गा बुलडोझर लावून जमीनदोस्त करावा व त्या ठिकाणची खोकी हटवावी.
त्याचबरोबर कर्नाळ रोड ब्लू झोन मधील ( पूर पट्ट्यातील ) बेकायदेशीर मदरसा जमीन दोस्त केला होता त्याचप्रमाणे साईनाथ नगर कर्नाळ रोड येथील आणखी एक ब्लु झोन ( पूर पट्ट्यातील ) बांधण्यात आलेले बेकायदेशीर मदरसा काढण्यात यावा.
वरील मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली जिल्हा व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी मनोज साळुंखे, राहुल बोळाज, संजय बापु तांदळे, पै.प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, गजानन माने, हरप्रीतसिंग गौड, दिग्विजय शिंदे, अविनाश मोहिते, रवींद्र वादवणे, राम काळे, अक्षय पवार, अनिकेत अंबरुळे,पवन चौगुले ,अमित पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या