सांगली : सांगली, मिरज व कुपवाड परिसरातील अंध पालकांच्या मुला-मुलींना शैक्षणिक मदत देण्यासाठी 26 जून 2026 रोजी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. “अंधपालकांना डोळस मदत” या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश अंध पालकांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करणे हा आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके, वह्या, पेन, शालेय फी, गणवेश तसेच इतर शैक्षणिक गरजांसाठी मदत करण्यात येणार आहे. सांगली, मिरज व कुपवाड परिसरातील शाळा व महाविद्यालयांत शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील.
कार्यक्रम ओंकार हॉल, एस.टी. स्टँडच्या पाठीमागे, सांगली येथे होणार असून इच्छुकांनी 9270539872 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“शिक्षण हीच खरी मदत, शिक्षण हीच खरी साथ” या संदेशातून समाजातील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमाला सहकार्य व देणगी देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
सह्याद्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय खेत्रे. स्वर गंधा चे संस्थापक प्रवीण पाखरे विशाल लालवानी. निखिल काळे. अनिकेत परीट. हेमंत ठक्कर. विनायक खेत्रे. ओंकार चिखले यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या