सांगली, प्रतिनिधी : महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला चालना देण्यासाठी ब्राह्मण महिला मंडळ व गणेश मंगल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता गणेश मंगल कार्यालय, मारुती चौक, सांगली येथे होणार आहे.
योग हा निरोगी जीवनशैलीचा पाया मानला जातो. सूर्यनमस्कार हा संपूर्ण शरीरासाठी लाभदायक व्यायाम प्रकार असून महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी महिलांना आदर्श स्थितीत सहा सूर्यनमस्कार सादर करावे लागणार असून स्पर्धकांचे गट वयोगटानुसार विभागले जाणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होताना वयाचा पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धकांनी स्वतःची सतरंजी किंवा योगा मॅट आणावी आणि योग्य पोशाखात उपस्थित राहावे, असे आयोजकांनी सांगितले आहे. २१ वर्षांवरील सर्व महिलांसाठी ही स्पर्धा खुली असून प्रवेश फी १५ रुपये ठेवण्यात आली आहे. स्पर्धेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी सुप्रिया जोशी (७९७२९६९८८३) व अनुश्री ओगले (९९६०४०९३१८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या