कोथळी, प्रतिनिधी :महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रम 2026-27 अंतर्गत आदर्श विद्यालय, कोथळी येथे “खेत बचाव अभियान” राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये शेती संवर्धन, माती व पाणी संरक्षण तसेच कृषी क्षेत्रातील विविध आव्हानांविषयी जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात “खेत बचाव अभियान” प्रतिज्ञा पत्राच्या उद्घाटनाने झाली. या प्रतिज्ञा पत्राचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. अर्चना शिंदे व आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. ए. बी. पादुले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना शेती संरक्षण व पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली.
यावेळी गावातून प्रभात फेरी काढून शेती व पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यात आले. विद्यार्थ्यांनी घोषणांच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण केली. अभियानात आदर्श विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी महाविद्यालयाचे डॉ. कुलभूषण पाटील यांनी केले. यावेळी एनएसएस अधिकारी प्रा. किशोर चंदुरे, समन्वयक प्रा. अमित पाटील व प्रा. एम. डी. कोळी उपस्थित होते.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2026-27 अंतर्गत सहभागी विद्यार्थी ओंकार खांडेकर, ओमकार मोरे, अन्सार मुजावर, पार्श्वनाथ चौगुले, यश बसर्गे, आकाश मुचंडी, प्रज्वल खटावकर, वैष्णव यादव, पृथ्वीराज भारती आणि विक्रांत माळी यांनी अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये शेती संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून, शेती व पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या