समडोळी : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) च्या समडोळी शाखा प्रमुखपदी युवा सामाजिक कार्यकर्ते चेतन चंद्रकांत पाटील यांची इचकरंजी येथे झालेल्या कार्यकारिणी बैठकीत निवड करण्यात आली. या निवडीमुळे समडोळी परिसरातील सर्व उपेक्षित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जितो च्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य तसेच गरीब गरजू नागरिकांसाठी आरोग्य विषयक मदत करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
याप्रसंगी जितोचे अध्यक्ष विजयजी भंडारी, राजेंद्रजी जैन, विमलजी सिंघवी, महावीर बागरेचा, अशोक शेट्टी, प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या