प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:येथील एसटी आगाराच्या कार्यशाळेत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या व त्याच्या पत्नीच्या छायाचित्रासह अधिकृत ई-मेलवर अश्लील आशयाचा मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी तासगाव आगाराच्या सहाय्यक कार्यशाळा अधीक्षका विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी पोलीस प्रशासना बरोबर चर्चा करून याबाबत त्या अधीकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.यां घटनेमुळे एसटी महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.याप्रकरणी श्रीधर पवार (रा.वृंदावन कॉलनी, तासगाव) यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यानुसार,निसार अहमद इब्राहिम नदाफ (रा. कवठेपिराण, ता. मिरज), सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक,एसटी आगार तासगाव, यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.फिर्यादी श्रीधर पवार आणि संशयित निसार नदाफ हे दोघेही एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत कार्यरत आहेत. फिर्यादीनुसार, दि.२० रोजी सायंकाळी ५ वाजून ४९ मिनिटांनी संशयिताने श्रीधर पवार आणि त्यांची पत्नी यांचा फोटो एसटी महामंडळाच्या अधिकृत ई-मेलवर पाठवला.या ई-मेलच्या सब्जेक्टमध्ये अश्लील भावना दर्शविणारा मजकूर लिहून तो विविध अधिकृत मेल आयडींवर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.विशेष म्हणजे,हा वादग्रस्त ई-मेल एसटी महामंडळाच्या अधिकृत मेल प्रणालीवर प्रसारित झाल्याने कर्मचारी आणि अधिकारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या