सांगली : शैक्षणिक, सामाजिक आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत भाजप महिला मोर्चाच्या सांगली जिल्हाध्यक्षा सौ. स्वातीताई सुशांत खाडे यांना 'लोकमत आयकॉन्स ऑफ साऊथ महाराष्ट्र' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर, खासदार अँड. उज्ज्वल निकम तसेच लोकमत माध्यम समूहाचे मुख्य संपादक व माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भाजप महिला मोर्चाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सामाजिक उपक्रम, पर्यावरण जनजागृती, आरोग्य, शिक्षण तसेच विविध लोकहिताच्या अभियानांमध्ये सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून त्यांचा हा सन्मान करण्यात आला.
यावेळी स्वाती खाडे म्हणाल्या, "हा सन्मान केवळ माझा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या, सातत्याने प्रोत्साहन व मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या कुटुंबीयांचा, भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आणि सर्व सहकाऱ्यांचा आहे. हा गौरव मला भविष्यात अधिक जोमाने समाजकार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे."
या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वाती खाडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या