प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनानुसार संत निरंकारी मंडळ (रजि., दिल्ली) ब्रँच मिरज यांच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सांगलीचे उपजिल्हाधिकारी श्री. सतीश कदम उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी सत्संगाचेही आयोजन करण्यात आले होते.
सत्संगाचे महत्त्व विशद करताना श्री. सतीश कदम म्हणाले की, मनातील विकार व नकारात्मक विचारांचे दमन करण्यासाठी संतांची संगत आवश्यक आहे. शिक्षणामुळे माणूस सुशिक्षित होऊ शकतो; मात्र सुसंस्कृत होण्यासाठी अध्यात्माची जोड आवश्यक आहे. आजच्या युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा असून त्या ऊर्जेचा योग्य वापर करून त्यांना सुजाण नागरिक बनविण्यासाठी संतांची शिकवण महत्त्वाची भूमिका बजावते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमास मिरज ब्रँचमधील गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच निरंकारी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी होणेसाठी यु.1510 चे सेवादल अधिकारी व सेवादल सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रँच मुखी श्री. सुनील पाटीलजी यांनी केले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या