प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शांतिनिकेतन बालविकास केंद्र इंग्रजी माध्यममध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जागृती निर्माण करणे आणि त्यांना निरोगी जीवनशैलीसाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ. सविता खांडेकर मॅडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शकुंतला मायाप्पा वावरे मॅडम, सौ. शुभांगी स्नेहलकुमार गवळी मॅडम आणि सौ. अलका मोहन निकम मॅडम यांची उपस्थिती लाभली. यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासनाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यामध्ये वज्रासन, वृक्षासन,सुखासन अशा प्रकारचे विविध आसन घेऊन त्यांनी योगासनाचे महत्त्व व फायदे सांगितले. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील सर, उपसंचालक डी. एस. माने सर तसेच मुख्याध्यापिका सौ. सविता खांडेकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या