कामेरी, ता. वाळवा : लोककल्प फाऊंडेशन व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या सहकार्याने तसेच माणिकचंद आर. एम. धारीवाल फाऊंडेशनच्या वतीने शिक्षण क्षेत्राला बळकटी देणारा उपक्रम राबविण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे विद्यालय, कामेरी येथे शाळेच्या शैक्षणिक गरजांसाठी 50 इंच आकाराचे दोन स्मार्ट टीव्ही प्रदान करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असून अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी आणि आकर्षक बनण्यास मदत होणार आहे. डिजिटल शिक्षणाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे रिलेशनशिप मॅनेजर श्रीधर जोग यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देताना लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच लोककल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने रिलेशनशिप मॅनेजर श्रीधर जोग, इस्लामपूर शाखेचे शाखा व्यवस्थापक श्रीराम खोचिकर, प्रादेशिक विपणन व्यवस्थापक सूरज पाटील, CSR सहाय्यक वैभव दाभाडे तसेच सिनियर एक्झिक्युटिव्ह अर्जुन देवर्डे उपस्थित होते.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण डी. ठाकूर यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली लोककल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य व सामाजिक विकासाशी संबंधित अनेक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत विकासाची फळे पोहोचविण्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
विद्यालय प्रशासनाने या उपयुक्त शैक्षणिक साहित्याबद्दल लोककल्प फाऊंडेशन, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि माणिकचंद आर. एम. धारीवाल फाऊंडेशनचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या