भिलवडी प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंकलखोप (ता. पलूस) गावातील स्वच्छतेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर केले होते. याकरिता आंदोलनाचा इशारा दिला होत . याची दखल घेत अंकलखोप ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे.निवेदनाद्वारे पावसाळ्यापूर्वी गावातील नाले, गटारी, सार्वजनिक ठिकाणे व रस्त्यांच्या परिसरातील स्वच्छता तातडीने करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी गावातील विविध भागांची पाहणी करून प्रत्यक्ष साफसफाईची कामे हाती घेतली. नाल्यांमधील गाळ काढणे, गटारींची स्वच्छता करणे, सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा हटविणे तसेच रस्त्यांच्या कडेला वाढलेली झाडाझुडपे हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.पावसाळ्यात स्वच्छतेअभावी डासांची उत्पत्ती वाढून विविध साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही स्वच्छता मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या या कामांमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, स्वच्छतेच्या प्रश्नावर सकारात्मक कार्यवाही झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.या कामाचा सातत्याने पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते महेश हजारे आणि कुलदीप वारे यांनी केला. त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाशी वेळोवेळी संपर्क साधून गावातील स्वच्छतेचा प्रश्न लावून धरला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच ग्रामपंचायतीने तातडीने हालचाली करून कामांना सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.स्वच्छता कामांची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महेश हजारे, कुलदीप वारे, आण्णा देवकुळे, प्रदीप देवकुळे, निलेश वारे, युवराज चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवून गावातील सर्व भाग स्वच्छ करण्याची मागणी करण्यात आली.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पक्ष सातत्याने पाठपुरावा करत असून, अंकलखोपमधील स्वच्छता मोहिमेला सुरुवात होणे हे त्याचेच फलित असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. गाव स्वच्छ, निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे अंकलखोपमध्ये स्वच्छता मोहिमेला गती
By -
जून २४, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या