तासगाव:ध्येय डोळ्यासमोर ठेऊन जिद्दीने पाऊल टाकत प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते अगदी असेच चित्र तासगांवात पाहवयास मिळाले आहे.येथील पत्रकार सुनिल गायकवाड यांचा मुलगा सार्थक सुनिल गायकवाड याने अत्यंत जिद्दीने पाऊल टाकत इंडियन एअर फोर्स परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात पास होण्याचा बहुमान मिळवला असून त्याची एअरमनपदी निवड झाली आहे.शैक्षणिक क्षेत्रात ध्येय डोळयासमोर ठेऊन जिद्दीने पाऊल टाकत प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळत हे तासगांवातील चि.सार्थक सुनिल गायकवाड याने इंडियन एअर फोर्स परीक्षेत यश संपादन करून दाखवून दिले आहे.सार्थक गायकवाड याचे वडिल सुनिल गायकवाड हे तासगांवात गेली २७ वर्षे पत्रकार म्हणून काम करीत आहेत.गायकवाड यांची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच पण या परिस्थितीत ही त्यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी काही पडू दिले नाही.पत्नी,एक मुलगा असा परिवार आहे.मुलाने परिस्थितीची जाणीव ठेवून नेहमीच शिक्षणात चांगले यश संपादन केले. चि.सार्थक याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण येथीलच पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात घेतले असून महाविदयालयीन शिक्षण याच महाविद्यालयात घेत आहे.संगणक शास्त्र शाखेत व्दितीय वर्षात असतानाच सार्थकने इंडियन एअर फोर्सची परिक्षा दिली.संपूर्ण परिक्षा प्रक्रियेमध्ये दोन टप्पे होते. पहिल्या टप्यात कोल्हापूर येथे दि.२६ सप्टेंबर २०२५ रोजी ५० मार्कची लेखी परिक्षा झाली. याचा निकाल ६ नोव्हेंबर २०२५ रोजी लागला. आणि दुसऱ्या टप्पा यासाठी निवड झाली. या दुसऱ्या टप्यासाठी दि.१५ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे फिजिकल फिटनेस, सिच्युएशन रिअॅक्शन टेस्ट, ग्रुप डिस्कशन असे परिक्षेचे तीन भाग झाले. यामध्ये यशस्वी झालेनंतर शारिरीक वैदयकिय तपासणी दि.२१ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे झाली.
यानंतर लक्ष लागून होते ते अंतिम यादीकडे दि 1 जून रोजी पात्र उमेदवारांची यादी लागली आणि इंडियन एअर फोर्स मध्ये एअरमेनपदी सार्थक गायकवाड याची निवड झाल्याचे स्पष्ट झाले. ही निवड होताच कुटुंबियांसह मित्रपरिवारात,अभ्यासीकेत, मैदानावर जल्लोषी वातावरणात सार्थकचे अभिनंदन करण्यात आले.
चौकट :
ध्येय निश्चित करून जिद्दीने प्रयत्न केल्यास यश निश्चितः सार्थक गायकवाड.
आपल्या यशा बाबत बोलताना सार्थक गायकवाड याने मी रोज ८ ते १० तास स्वतःच अभ्यास करीत होतो. तसेच मैदानावर रोज दोन तास सराव करीत होतो. हे यश अपेक्षित असेच आहे. अभ्यासात क्वॉटिटीपेक्षा क्वॉलिटी महत्वाची आहे ध्येय निश्चित करून जिद्दीने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते असे स्पष्ट करून अभ्यासाचे योग्य नियोजन करून सातत्य ठेवले पाहिजे असे सांगितले.
सार्थक गायकवाडची एअर फोर्स मध्ये निवड. पहिल्याच प्रयत्नात पास होण्याचा बहुमान!"
By -
जून ०२, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या