प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, मिरज येथे सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या समृद्धी पाटील (98.40%), ईश्वरी पाटील (98%), प्रांजल साळे (96.80%), शिवानी पाटील (95.80%), आदिती चवदार (95%)अर्षद मकानदार (95%) त्याचबरोबर एकता पवार आणि मनस्वी लकडे (मराठी मध्ये 100%) आणि अद्वैत जाधव (ITमध्ये100%) तसेच 90% पेक्षा जास्त गुण मिळविणारे 25 विद्यार्थी आणि 75 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणारे 35 विद्यार्थी यांनी यश भरघोस यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवपूर्ण सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि गुणवत्तेचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.यंदाच्या दहावीच्या परीक्षेत शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उत्कृष्ट यश संपादन केले. या यशामध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागील पालक, शिक्षक आणि शाळेचे योगदान याचाही यावेळी गौरव करण्यात आला.कार्यक्रमात बोलताना शाळेचे संस्थापक पृथ्वीराज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, “यश हे कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित असते तसेच यश नशिबाने नाही तर कष्टाने मिळत असते.विद्यार्थ्यांनी हे यश पुढील वाटचालीसाठी प्रेरणास्थान मानून अधिक उंच भरारी घ्यावी,” असे प्रतिपादन केले. शाळेचे विश्वस्त वीरेंद्र पाटील, समन्वयक सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका ख्रिस्टीना मार्टिन, प्रशासक रफिक तांबोळी उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर ,समन्वयक अश्विनी येळकर आणि कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या श्रीदेवी कुल्लोळी आणि साहेबलाल शरीकमसलत गजबर सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या यशामागील मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक केले.
सत्कारप्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक, शिक्षक आणि शाळेने दिलेल्या मार्गदर्शनाला दिले. कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण झाले.
"यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे भविष्यातील यशस्वी भारताची पायाभरणी" या भावनेने संपन्न झालेला हा सत्कार समारंभ उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. संपूर्ण कार्यक्रम अभिमान, आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या