प्रतिष्ठा न्यूज | पंढरपूर प्रतिनिधी
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी, नागरिक आणि ग्रामस्थांच्या हक्कांसाठी रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता करकंब (ता. पंढरपूर) येथील आनंदी-मंगल कार्यालयात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
"जमीन आमची देणार नाही, संघर्ष आमचा थांबणार नाही!" या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात शक्तीपीठ महामार्गामुळे होणारे परिणाम, शेतकऱ्यांच्या जमिनींचे संरक्षण, नुकसानभरपाई तसेच पुढील आंदोलनाची दिशा यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
या मेळाव्यास माजी आमदार सतेज (बंटी) पाटील, खासदार राजू शेट्टी, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे आणि शक्तीपीठ महामार्ग विरोध समितीचे दिपक लाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच शेतकरी चळवळीतील प्रमुख नेते मारुती (नाना) चव्हाण हेही मेळाव्याला उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
आयोजकांनी शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या सर्व शेतकरी बांधव, महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हक्काच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या