प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत विविध मानधन आणि निवृत्तीवेतन योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी पात्र लाभार्थ्यांनी जून २०२६ पर्यंत आपले हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक केले आहे.मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास जुलै २०२६ पासूनचे अनुदान वितरण थांबविले जाण्याची शक्यता असल्याचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी सांगितले.सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या ७ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार,आता लाभार्थ्यांना 'Beneficiary Satyapan App' या मोबाईल प्रणालीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने हयात प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.राज्य केंद्र शासनाच्या खालील विविध योजनांमधील विधवा,परितक्त्या, दिव्यांग,दुर्धर आजारी व्यक्ती,अनाथ आणि वयोवृद्ध लाभार्थ्यांना हा नियम लागू राहील,असे त्यांनी सांगितले.संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांसाठी नियम लागू आहेत.याबाबत तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय आदी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तहसील कार्यालयात ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांनी डिजिटल हयात प्रमाणपत्र, आधार कार्ड झेरॉक्स, तहसिलदार यांचा वार्षीक उत्पन्नाचा दाखला, अपंग असलेस युडीआयडी कार्ड अशी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. आता लाभार्थ्यांना "Beneficiary Satyapan App' या मोबाईल प्रणालीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने हयात प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. याबाबत कोणतीही अडचण असल्यास तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, लाभार्थ्यापर्यत शासकीय योजना पोहोचविणे हे आमचे कर्तव्य आहे.ज्या लाभार्थ्यांना याठिकाणी येणे जमत नाही त्यानी तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय आदी अधिका-याशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या