सांगली : कर्मवीर पतसंस्थेचे संस्थापक व्हाईस चेअरमन तथा ख्यातनाम आर्थोपेडिक सर्जन डॉ. रमेश ढबू यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त संस्थेचे संचालक, कर्मचारी, सल्लागार, ग्राहक तसेच विविध सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
डॉ. रमेश ढबू हे गेल्या अनेक वर्षांपासून आर्थोपेडिक सर्जन म्हणून सांगली परिसरात उल्लेखनीय सेवा बजावत आहेत. सुमारे ३८ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कर्मवीर पतसंस्थेच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. संस्थेच्या स्थापनेच्या वेळी कै. डॉ. आप्पासाहेब चोपडे हे चेअरमन तर डॉ. रमेश ढबू हे व्हाईस चेअरमन म्हणून कार्यरत होते. आज ही संस्था सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये यशस्वीपणे कार्यरत असून हजारो सभासदांचा विश्वास संपादन केला आहे.
यावेळी संस्थेचे माजी चेअरमन रावसाहेब पाटील म्हणाले की, “कर्मवीर पतसंस्थेच्या प्रत्येक प्रगतीमध्ये तसेच अडचणीच्या काळातही डॉ. रमेश ढबू यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि मार्गदर्शनामुळे संस्था आज भक्कमपणे उभी आहे. त्यांना निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा.”
याप्रसंगी चेंबर ऑफ कॉमर्सचे गव्हर्निंग संचालक अमित चिंचवडे, भाजप जैन प्रकोष्ठाचे प्रशांत गौंडाजे, जैन प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष महावीर पाटील यांच्यासह कर्मवीर पतसंस्थेचे शाखाधिकारी, विभागीय अधिकारी, कर्मचारी, सेवक व ग्राहकांनी डॉ. ढबू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच भाजप जैन प्रकोष्ठ व दक्षिण भारत जैन सभा यांच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या