प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तंटामुक्तीचा आदर्श निर्माण करणाऱ्या बेंद्री गावाची जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्या पायलट प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली आहे. गावातील वाद-विवाद स्थानिक स्तरावरच सामंजस्याने मिटविण्याच्या परंपरेची दखल घेत ही निवड करण्यात आल्याची माहिती मान्यवरांनी दिली.
यावेळी जिल्हा न्यायाधीश गिरीजेश कांबळे, निवृत्त न्यायाधीश कोगनोळी सर, गटविकास अधिकारी शेखर भिलारे तसेच पोलीस उपनिरीक्षक रामदास काबुगडे यांनी ग्रामस्थांना कायदेशीर हक्क, न्याय मिळविण्याची प्रक्रिया आणि शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषतः महिलांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत गरजू नागरिकांना न्यायप्रक्रियेच्या सुरुवातीपासून निकालापर्यंत मोफत कायदेशीर मदत व वकिलांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते,अशी माहिती यावेळी देण्यात आली.या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.दरम्यान,मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बेंद्री ग्रामपंचायतीने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला असून नुकतीच जिल्हास्तरीय समितीने गावाची पाहणी केली आहे.कार्यक्रमास सरपंच मंगल पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील, पोलीस पाटील अनुराधा गायकवाड, दिनकर पाटील, मनोहर पाटील, श्रीकांत अभंगे, अनिल पाटील, विकास पाटील, विजय पाटील, चंद्रकांत शिंदे, नंदकुमार जाधव, उमेश पाटील, महेश पाटील, प्रकाश पाटील, निलेश गवळी, सचिन मदने यांच्यासह ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत होनमोरे सर व ग्रामविकास अधिकारी शबाना आत्तार यांनी केले, तर आभारही त्यांनीच मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या