सांगली प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली, वकील संघटना, जिल्हा व सत्र न्यायालय, सांगली तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार सकाळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आवारात वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा महत्वपूर्ण संदेश देण्यात आला.
कार्यकमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. गि.ग. कांबळे यांनी केले. पर्यावरणाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करत त्यांनी वृक्षसंर्वधनाची गरज विशद केली.
कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अदिती कदम होत्या. मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, "झाडे ही पृथ्वीची फुफुसे आहेत. पर्यावरण संरक्षण हा सध्याच्या मानवी जिवनासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. प्रत्येक रोपटे म्हणजे भविष्यातील श्वास आहे. आपल्याला पुढच्या पिढीला शाश्वत देणे द्यायचे असेल तर प्रत्येकाने हिरवाईचा वारसा निर्माण करण्याची गरज आहे.
आजच्या पर्यावरण दिनी वृक्षारोपन, संवर्धन आणि संरक्षणाची पवित्र प्रतिज्ञा करुया. यावेळी त्यांनी ओझोन थराचे होत असलेले नुकसान, वनसंपत्तीतील घट आणि प्लॉस्टिकच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, प्लॉस्टिकचा वापर टाळावा आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मुख्यालयातील जिल्हा न्यायाधीश श्री. व्ही. व्ही. निंबाळकर, कौटुंबिक न्यायाधीश, श्रीमती. एस. जे. घरत, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तसेच प्रभारी प्रबंधक महेश गुर्लहसूर व न्यायलयीन कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याकार्यक्रमाचे नियोजन जिल्हा प्राधिकरणाचे अधिक्षक श्री. शंकरराव वानखेडे व इतर कर्मचारी यांनी केले. जिल्हा न्यायालय, सांगली मुख्यालयातील सर्व न्यायाधिश, वकिल व न्यायालयीन कर्मचा-यानी पर्यावरण सर्वधनासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. समाजाच्या प्रत्येक घटकाने पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्विकारल्यास हरित, सर्मध्द आणि शाश्वत भविष्य घडविणे शक्य होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला
कार्याकमाच्या शेवटी निसर्गरंग फौंडेशनचे अध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या