तासगाव : तासगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठी मा. खासदार संजयकाका पाटील यांनी १४ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करून घेतला होता. त्यापैकी पहिला टप्प्यामध्ये ५ कोटी एवढा निधी प्राप्त झाला असुन इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. आणि आता दुसऱ्या टप्प्यात ७५ लाख एवढा निधी सध्या प्राप्त झाला असून यामुळे इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होणेस मदत होणार आहे. यामुळे इमारतीचे बांधकाम पूर्ण होवून ही इमारत जनतेच्या सेवेसाठी सज्ज असेल, असे मत मा. खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले.
तसेच पुढे ते म्हणाले की, तासगाव पंचायत समिती ही ग्रामीण भागातील जनतेच्या दृष्टीने विकासाचे मंदिर असून त्यानुसार ही एक सुसज्ज आणि प्रशस्त इमारत असावी, या उद्देशाने याकरीता १४ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता, गेली एक वर्षभर या नुतन इमारतीचे काम अगदी उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे. त्या कामाचा प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा वरचेवर आढावा घेत आहे.
एक महिन्यापूर्वी उर्वरीत निधी साठी ग्रामीण विकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यापैकी ७५ लाखाचा निधी ०३ जून २०२६ ला प्राप्त झाला. त्याबद्दल मंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासनाचे आभार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले आणि ही इमारत लवकरच जनतेच्या सेवेसाठी कशी उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असा मनोदय व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या