सांगली : सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका शाळा क्र. 39 ऊर्दू येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. यावेळी नव्याने शाळेत दाखल झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले.
प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके, दफ्तर, फुले व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. शाळेच्या वतीने नवागत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका मालमत्ता विभागाच्या अधीक्षक सौ. सानप मॅडम उपस्थित होत्या. तसेच वार्ड क्र. 11 चे नगरसेवक रमेश सर्जे, नगरसेविका अंजली जाधव, नगरसेविका अश्विनी कोळेकर, केंद्र प्रमुख भारत बंडगर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मोठ्या संख्येने पालकही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सौ. सायराबानो चौधरी यांनी केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते वसिम जावेद बलबंड यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल वसिम जावेद बलबंड यांचा सत्कार नगरसेवक रमेश सर्जे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेण्याचे आवाहन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रवेशोत्सवामुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या