सांगली प्रतिनिधी : सांगली शिक्षण संस्थेच्या सिटी हायस्कूलमध्ये सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी नवागतांचा स्वागत सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरण संपन्न झाला. यामध्ये इयत्ता पाचवीला नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून, मंगल वाद्यवृंदाच्या गजरात , दुतर्फा पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उभी केलेली स्वागतकमान व फलकलेखन सर्व विद्यार्थी व पालकांचे आकर्षण ठरले.याप्रसंगी मुख्याध्यापक सुरेश गोडे, उपमुख्याध्यापक प्राची गोडबोले पर्यवेक्षक विद्या जाधव, ज्येष्ठ शिक्षक अरुण मिरजकर, उज्वला माळी प्रकाश कानडे, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन श्रीमती हेमलता अष्टेकर, बाळकृष्ण महाले, कलाध्यापक सागर सगरे ,शिवदास चौरे, लिपिक प्रशांत वठारकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार विभुते यांनी केले.
सिटी हायस्कूलमध्ये नवागतांचे स्वागत
By -
जून १६, २०२६
0
प्रतिष्ठा NEWS
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या