प्रतिष्ठा न्यूज
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगली जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण व वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. पद्माकर जगदाळे यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पक्षाचे कार्याध्यक्ष जमीलभाई बागवान यांनी भूषविले. यावेळी गटनेते मैनुद्दीन बागवान व कार्याध्यक्ष जमीलभाई बागवान यांच्या हस्ते पक्षध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी पक्षाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्य व देशाच्या राजकारणात केलेल्या योगदानाचा उल्लेख करत पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास रोजगार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष प्रशांतदादा माने, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रशांत बापू आगवेकर, जिल्हा उपाध्यक्ष सरफराज भैया कच्छी, युवक जिल्हाध्यक्ष आकाश माने, युवक शहराध्यक्ष तोहीद फकीर, वैद्यकीय शहराध्यक्ष अझीम पठाण, युवक कुपवाड अध्यक्ष दादासाहेब कोळेकर, शुभम पवार, दीपक मगदूम, शिवचरण आगवेकर, शरद साळुंखे, पोतदार साहेब यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पक्षवाढीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 27 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या