सांगोला : सांगोला येथील सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे सहशिक्षक राजाराम दामोदर ढोले (वय 49) यांचे सोमवार दि. 25 मे 2026 रोजी जनगणनेचे कर्तव्य पार पाडत असताना आकस्मिक निधन झाले. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम ढोले यांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सांगोला नगरपालिका हद्दीतील पाटील वस्ती परिसरात जनगणनेचे काम सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आली व ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना उलटीचाही त्रास झाला.
घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक अमोल कोरे यांनी तातडीने त्यांना खासगी वाहनातून सांगोला येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सायंकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजाराम ढोले यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनाने ढोले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शिक्षण क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जनगणनेचे काम करत असताना शिक्षकाचा मृत्यू ही बातमी वाचून खूप वाईट वाटले. तरुण शिक्षकाचा अकस्मात मृत्यू ही अतिशय दु:खदायक गोष्ट आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबावर फार मोठे संकट ओढवले आहे. सध्या उन्हाळा फारच तीव्र आहे. तेव्हा तेव्हा कामाला उशीर झाला तरी चालेल पण प्रकृती सांभाळून सेवकांनी काम करावे ही विनंती.
उत्तर द्याहटवा