प्रतिष्ठा न्यूज
सांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथील कर्नाळ हायस्कूल कर्नाळ या विद्यालयातील दहावीच्या २००८ या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा १८ वर्षांनी स्नेहमेळावा पार पडला. कार्यक्रमाला हायस्कूलचे विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.
या बॅचमधील विद्यार्थ्यांनी गणेशपूजन दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हायस्कूलमध्ये शिकत असताना शिक्षकांच्या, मित्र- मैत्रीणींसोबतच्या आठवणी जाग्या केल्या. हायस्कूलमधूनच आपण कसे घडत गेलो यासोबतच मित्र- मैत्रीणींची सुख-दु:खत मिळालेली साथ सांगून इथून पुढेही असेच एकमेकांना सहकार्य करत राहू अशी भावना व्यक्त केली. हायस्कूल मधूनच जीवनाला नवी वेगळी दिशा मिळाल्याचे सांगितले.
यावेळी फनी गेम्स व गाण्यांचा आनंदही सर्वांनी लुटला. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना कायमची आठवण म्हणून भेटवस्तूंचे वाटप केले. स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी सुनिल नरळे, सुहास जाधव, अविनाश पाखरे, भालचंद्र चव्हाण, इब्राहिम शेख, निकिता कदम व विशाखा माने यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या