प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गुंठेवारी क्षेत्रातील लाखो नागरिकांना हक्क मिळवून देण्यासाठी तीन दशकांहून अधिक काळ संघर्ष करणारे आणि जयहिंद सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांचा वाढदिवस २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता गुंठेवारी भवन येथे साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन कोणताही डामडौल न करता सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
१९९४ साली 'गुंठेवारी' हा शब्द महसूल खात्याच्या नोंदीतही नव्हता. शहरालगतच्या शेतजमि नींचे छोटे तुकडे करून उभारण्यात आलेली घरे अनधिकृत ठरत होती. अशा लाखो कुटुंबांना ना सातबारा नोंद, ना वीज, पाणी किंवा रस्त्याच्या सुविधा मिळत होत्या. या नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी चंदनदादा चव्हाण यांनी गुंठेवारी चळवळीचा झेंडा हाती घेतला. माजी खासदार प्रकाशबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या चळवळीची पुढील संपूर्ण जबाबदारी त्यांनी सांभाळली.
सांगली जिल्ह्यात 'हंटर फोड आंदोलन' आणि 'बोंबाबोंब आंदोलन' यांसारख्या आक्रमक आंदोलनांद्वारे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. तत्कालीन मुख्यमंत्री कै. मनोहर जोशी यांच्यासमोर त्यांनी गुंठेवारीचा प्रश्न ठामपणे मांडला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे २००१ साली महसूल खात्यात 'गुंठेवारी' हा शब्द अधिकृतपणे समाविष्ट झाला आणि गुंठेवारी कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील
लाखो कुटुंबांना त्यांच्या घरांचा कायदेशीर हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
जयहिंद सेना पक्षाच्या माध्यम ातून त्यांनी राजकीय क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली असून महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांत पक्षाचे कार्य विस्तारले आहे. सांगली येथे त्यांनी महाराष्ट्रातील पहिले 'गुंठेवारी भवन' उभारले असून येथे दररोज शेकडो नागरिकांना मोफत मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना 'सांगली भूषण' आणि 'क्रांतिवीर' यांसारख्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या