सांगली प्रतिनिधी : जिल्हा परिषद सदस्यपदी दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल तसेच वारणा दूध संघाच्या संचालकपदी सलग सहाव्यांदा निवड झाल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख अभिजीत पाटील (चिकुर्डे) यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद हॉल येथे आयोजित कार्यक्रमात मुस्लिम समाजाचे नेते तसेच ऑल इंडिया उलेमा बोर्डचे कर्नाटक व गोवा प्रभारी माननीय तौफिक भाई मौलवी यांच्या हस्ते अभिजीत पाटील यांना शाल, पुष्पगुच्छ आणि इंग्रजी भाषांतरित कुराण देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अभिजीत पाटील यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच भविष्यातही त्यांच्या हातून समाजहिताची अशीच कार्ये घडत राहोत, अशा शुभेच्छाही उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास रुग्णमित्र सामाजिक कार्यकर्ते उमर गवंडी, जुबेर खान, इम्रान बलबंड, जनआरोग्य अधिकारचे सचिव राजेश साळुंखे, ह्यूमन राईट जस्टिसचे राष्ट्रीय महासचिव हनीफ डफेदार आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या